अबीर गुलाल उधळीत रंग
354.
अबीर गुलाल उधळीत रंग । नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग।
उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हिन । रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीनं। ।
पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग। नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥१॥
वाळवंटी नाचू आम्ही वाळवंटी गाऊ । चंद्रभागेच्या पाण्याचे अंग अंग न्हाऊ।
विठ्ठलाचे नाम घेऊ होऊ निया दंग । नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥२॥
आषाढी कार्तिकी भक्त गोळा होती । चंद्रभागेच्या वाळवंटी संत गोळा होती।
चोखा म्हणे नाम घेता भ्त होती दंग । नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥३॥
