देवाचिया द्वारी उभा
351.
देवाचिया द्वारी उभा क्षणभरी ।
तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥२॥
असोनि संसारी जिव्हे वेगु करी ।
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा ।
द्वारकेचा राणा पांडवा घरी ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
