उदंड तीर्थे क्षेत्रे
353.
उदंड तीर्थे क्षेत्रें पाहातां दिठी । नाही सृष्टी तारक ॥१॥
स्नानें पावती मुक्ति जगा । ऐशी चंद्रभागा समर्थ ॥२॥
पुंडलिका नमस्कार । सकळ पूर्वजां उद्धार ॥३॥
पाहता राउळाची ध्वजा । मुक्ती सहजा राबती ॥४॥
एका जनार्दनी विठ्ठल भेटी । मग लाभा नये तुटी ॥५॥
