राहिली वासना पायासवे
348.
राहिली वासना पायासवे चाड । आन नाही कोड माझे कांही ॥१॥
तुमची कृपादृष्टी असावी मजवरी । आणि नामया सेजारी सुखवस्ती ॥२॥
महाद्वारापुढे मज ठाव द्यावा । हेचि केशवा मागतसे ॥३॥
चोखा म्हणे आजि वाटते उदास । घडिये घडिये आस पंढरीची ॥४॥
