सहस्त्रदळांत आकाशाच्
347.
सहस्त्रदळांत आकाशाच्या परी |राहोनी शरीरी शोभा दावी ॥१॥
तेचि नटे थाटे ऊभे विटेवरी |कर कटावरी ठेऊनिया ॥२॥
जयाचिये नाही जन्मला विधाता |तेथोनी वाढता लोक जाला ॥३॥
श्रुतीचिये वाचे नोहे गोचर |तेथे अवतार तिही देवा ॥४॥
नामा म्हणे विश्वंभरु आणिक |अंगुळ दशक आहे जे का ॥५॥
