वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

सत्रावीचा खेळ लक्षवे

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075150 · अभंग क्र. ३५५

355.
सत्रावीचा खेळ लक्षवेना कवणा ।
ब्रह्मादिक जाणा अगम्य ते ॥१॥
रात्रंदिवस मन चपळत्वे धावते ।
तेही सत्रावीते नपवेची ॥२॥
सत्रावी अगम्य विधि हरिहरा ।
लक्षू पाहता बरा गोविंदु गे ॥३॥
ज्ञानदेव दर्शन सत्रावीचे घेता ।
उन्मनी ठसावी निवृत्तिदाता ॥४॥

अर्थ :
योगाभ्यासाने योगी लोक आपल्या हृदयातील कुंडलिनी शक्ती जागृत करून तिचा धक्का ब्रह्मस्थानांत असलेल्या अमृतसरोवरात देतात. त्यामुळे अमृत थोडे थोडे गळू लागते. त्या अमृतालाच सत्रावीचे ‘पय' असे म्हणत प्रमाणे ती कुंडलिनी जागृत करून अमृतपान करणे हे योगी लोकांना मोठे त्रासाचे असते. त्या सत्रावीचा खेळ मोठा विचित्र आहे. तो ब्रह्मदेवाला, नेहेमी भटकणाऱ्या मनाला, विष्णु व शंकर यानांही कळण्यास कठीण आहे. या खटपटीत पडण्यापेक्षा गोविंद नामोच्चार करणे सोपे आहे. निवृत्तीराया कृपेने सत्रावीयेच्या अमृत कलेची प्राप्ती झाली तर उन्मनी दशा सहज ठसावते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग