वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

शून्य शोधिले नाही जे

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075155 · अभंग क्र. ३५३

353.
शून्य शोधिले नाही जेणे ।
काय विवरण केले तेणे ।
अज्ञानपणे फुगणे ।
गाढव जिणे पशूचे ॥१॥
वर्णाकृति शून्याचार ।
हा नाही ज्या विचार ।
न घडे न घडे साक्षात्कार ।
जाण सर्वथा तया नरा ॥२॥
आधी शून्याची शोधणी केली ।
मग सद्वस्तु प्राप्ती झाली ।
अमृत वेळाची बोली ।
बोलता नये ॥३॥
आधी शून्य ते शुभ्रवर्ण ।
मध्ये श्वेत रचिले जाण ।
अर्ध शून्य ते ताम्रवर्ण ।
प्रत्यक्ष जाण दिसतसे ॥४॥
महाशून्याचा वर्ण निळा ।
अव्यक्त तेजाचा ओतिला गोळा ।
ग्रासूनि ठेला भूगोळा ।
योगी डोळा पाहती ॥५॥
ऐसे शून्याचे नाही ज्ञान ।
तंववरी अवघेच अज्ञान ।
जनी अवघा जनार्दन ।
अज्ञान सज्ञान काय बोले ॥६॥
ब्रह्मज्ञानाची किल्ली ।
सांगितली एकेंची बोली ।
निवृत्तिराजे बोलविली बोली ।
तेंची बोली बोलिलो ॥७॥

अर्थ :
योग्याभ्यासीला दिसणारा ‘निल' तेजोमय बिंदु हेच कोणी शून्य ज्याने पाहिले नाही. त्याने कशाचा विचार केला? व न कळण्याने ज्याचा अहंकार वाढला अशा मनुष्याचे जगणे गाढवा सारखे व्यर्थ होय. ज्या ब्रह्माच्या ठिकाणी याचा साक्षात्कार, वर्णभेद नाही. लहान मोठे स्थूळ कृश हा आकारभेद नाही. अशा साक्षात्कार योग्यावाचून इतरांना होणार नाही. अगोदर ते नीलबिदुरूप शून्य पाहिले. व मग आम्हाला आत्मवस्तुची प्राप्ती झाली, त्या अमृतमय वेळेचे वर्णन शब्दांनी करता येत नाही. तो बिंदु बाहेरून पांढरा त्याच्या आत शुभ्रवर्ण व आतील भाग तांबूस दिसतो. शून्याची आतिल बाजू जिला महाशून्य असे म्हणतात. ती निळ्या रंगाची असते. ती इतकी तेजस्वी असते की जणू काय तिच्यामध्ये ब्रह्मतेजच भरले आहे असे वाटते. जगाचा निरास करून योगी लोक हे शून्य पाहातात. का तहेच्या शून्याचे ज्ञान झाले नाही, तोपर्यंत सर्व अज्ञानच आहे असे समजावे ते पाहिले तर आत्मा सर्वव्यापक असल्यामुळे कोणाला ज्ञानी म्हणावे, कोणाला अज्ञानी म्हणावे व कोणाला संज्ञानी म्हणावे? कारण दोन्ही ब्रह्मरूपच आहेत. श्री गुरु निवृत्तीनाथांमुळे ब्रह्मज्ञानांची गुरूकिल्लीमला मिळाली. व त्यांनी ती माझ्याकडून बोलवली तशी मी बोलून दाखविली असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग