माझी तू माउली माझी त
347.
माझी तू माउली माझी तू माउली । माझी तू माउली विठ्ठला तू ॥१॥
मज का मोकलिले वेगळे का केले । का बा धाडियेले मंगळवेढ्या ॥२॥
काय माझा भार झालासे जोजार । म्हणोनी केले दूर पायापरते ॥३॥
चोखा म्हणे मज द्रव्याची नाही चाड । तुझे नाम गोड मुखी गाता ॥४॥
