सत्शास्त्रश्रवण सत्स
349.
सत्शास्त्रश्रवण सत्संगसेवन ।
देव तयाहून आणिक नाही ॥१॥
शिष्टासी सन्मान शास्त्रांचा अभिमान ।
असे तोचि जाण ब्रह्मनिष्ठ ॥२॥
शांति क्षमा दया उपजे भूतकृपा ।
तोच एक देखा ब्रह्मनिष्ठ ॥३॥
बहेणि म्हणे कर्मे ब्रह्म जपा माने ।
तेचि पै जाण ब्रह्मरूप ॥४॥
