आनुपम्य भाग्य नांदते
346.
आनुपम्य भाग्य नांदतें पंढरी । विठ्ठल निर्धारी उभ जेथे ॥१॥
अनुपम्य वाहे पुढे चंद्रभागा । दोषा जाती भंगा नाम घेता ॥२॥
अनुपम्य मध्ये पुंडलीके मुनी । अनुपम्य चरणी मिठी त्याच्या ॥३॥
संत शोभती दोही बाही । अनुपम्य देही सुख वाटे ॥४॥
अनुपम्य एका जनार्दनी ठाव । अनुपम्य पंढरीराव विटेवरी ॥५॥
