भावेवीण भक्ति भक्तिव
354.
भावेवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति ।
बळेवीण शक्ति बोलू नये ॥१॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित ।
उगा राहे निवांत शिणसी वाया ॥२॥
सायासे करिसी प्रपंच दिनदिशी ।
हरीसी न भजसी कोण्या गुणे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे ।
तुटेल धरणे प्रपंचाचे ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
