न करी न करी कोन्हाची
357.
न करी न करी कोन्हाची तू निंदा । अंतरी गोविंदा पावसील ॥१॥
जनी जनार्दन कोनासी निंदावे । साक्षेपे वंदावे विश्वरुप ॥२॥
विश्री हा ईश्वर शास्त्रे हे बोलती । जे नर निंदीती त्यासी न कळे ॥३॥
ज्याचे जैसे कर्म त्याचीया ते माया । आपण सर्वथा बोलो नये ॥४॥
बोलिले जे कर्म तोचिरे गुंतले । येर ते सुटले सहज कस्थती ॥५॥
सहज कस्थती कर्म चोखामेळा करी । कर्म माजी हरी दिसता हे ॥६॥
