वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 125. गौळणी

गौळणी

🙏 4. संत नामदेव · ABH-083039 · अभंग क्र. २४३

243.
गौळणी

परब्रम्ह निष्काम तो हा गौळिया घरी । वाक्या वाळे अंदु कृष्ण नवनीत चोरी ॥१॥
म्हणती गौळणी हरीची पाउले धरा । रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा ॥२॥
लपत छपत येतो हरी हा राजभुवनी । नंदासी टाकूनि आपण बैसे सिंहासनी ॥३॥
सांपडला देव्हारी यासी बांधी दाव्यांनी । शंख चक्र गदा पद्म शारंगपाणी ॥४॥
बहुता कष्टे बहुता पुण्ये जोडले देवा । अनंत पवाडे तुमचे न कळती मावा ॥५॥
नामा म्हणे केशवा अहोजी तुम्ही दातारा । जन्मोजन्मी द्यावी तुमची चरणसेवा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग