न मिळो खाव्या न वाढो
246.
न मिळो खाव्या न वाढो संतान । परी हा नारायण कृपा करो ॥१॥
ऐसी माझी वाचा मज उपदेशी । आणिक लोकांसी हेचि सांगे ॥२॥
विटेंबो शरीर होत का विपत्ती । परी राहो चित्ती नारायण ॥३॥
तुका म्हणे नाशिवंत हे सकळ । आठवे गोपाळ तेंची हीत ॥४॥