वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

भक्तिबळे इच्छा पुरवि

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076367 · अभंग क्र. २४३

243.
भक्तिबळे इच्छा पुरवितो देव ।
आला अनुभव पुंडलीका ॥१॥
म्हणोनिया भक्ति असावे कारण ।
आहे नारायण भाव तेथे ॥२॥
पक्क तुळसीपत्रा-आत प्रवेशून ।
तुळेसी तो देव तुका न ये ? ॥३॥
द्रौपदीची वस्त्रे स्वये जाला देव ।
पोह्यांसाठी गाव सोनियाचा ॥४॥
भाजीचिया पाने तृप्त केले ऋषी ।
भावे गणिकेसी वैकुंठ ते ॥५॥
बहेणि म्हणे भाव तोचि आम्हा देव ।
नाही या संदेह अणुमात्र ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग