वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 124. श्रीकृष्णलीला

जन्म गेले याचे राखता

🙏 4. संत नामदेव · ABH-083808 · अभंग क्र. २३८

238.
जन्म गेले याचे राखता गाई । याचिया बोला वि-श्वास काई ॥१॥
गोधने राखितो आपण पेंढारा । तुझ्यानी मिळती पाणियाचा थारा ॥२॥
हाती डांगा खांदी कांबळा । तुझ्या गाई आह्मी राखो गोपाळा ॥३॥
आठ कोटी नव बहात्री गाई । गोधने बैसली आपुले ठायी ॥४॥
धाली गोधने बसली वाडा । संत पाहो आले तंव झोंपा उघडा ॥५॥
गोधने चरती बाराही राने । माझे मन तुझे वासरू तान्हे ॥६॥
गोधने चारिता कृष्ण सांगाती । विष्णुदास नामा देतुसे वळती ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग