भाव तेथे भ्जक्ति, भक
239.
भाव तेथे भ्जक्ति, भक्ति तेथे ज्ञान ।
ज्ञाने समाधान होय चित्ता ॥१॥
मग तू सहज समाधी पावसी ।
चित्त नामापाशी लीन होय ॥२॥
संतसमागमी असोनी श्रवण ।
सदा सावधान अनुक्रमी ॥३॥
बहेणि म्हणे भक्ति पाहिजे कारण ।
मग त्या निर्वाणपदप्राप्ती ॥४॥
