भावार्थाचे दावे देवा
244.
भावार्थाचे दावे देवाचिया गळा ।
तयासी मोकळा कोण करी ॥१॥
विचारिता जन्म सोसी गर्भवास ।
द्वारपाळ त्यास करी बळी ॥२॥
भावार्थाच्या खुंटी बांधिला हा देव ।
सोडी ऐसा राव कोण आहे ॥३॥
बहेणि म्हणे भावतंतु कोण सांडी ।
भावार्थ-परवडी देव जाणे ॥४॥
