वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 11. उपदेश

आम्ही आणि संत संत आण

🙏 16. संत जनाबाई · ABH-074034 · अभंग क्र. २४४

244.
आम्ही आणि संत संत आणि आह्मी । सूर्य आणि रश्मि काय दोन ॥1॥
दीप आणि सारंग सारंग आणि दीप । ध्यान आणि जप काय दोन ॥2॥
शांति आणि विरक्ति विरक्ति आणि शांती । समाधान तृप्ति काय दोन ॥3॥
रोग आणि व्याधी व्याधी आणि रोग । देह आणि अंग काय दोन ॥4॥
कान आणि श्रोत्र श्रोत्र आणि कान । यश आणि मान काय दोन ॥5॥
देव आणि संत संत आणि देव । म्हणे जनी भाव एक ऐसा ॥6॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग