कासया गुणदोष पाहो आण
243.
कासया गुणदोष पाहो आणिकांचे । मज काय त्यांचे उणे असे ॥१॥
काय पाप पुण्य पाहो आणिकांचे । मज काय त्यांचे उणे असे ॥२॥
नष्ट दृष्टपण कवणांचे वाणू । तयाहून अणु अधिक माझे ॥३॥
कुचर खोट मज कोण असे आगळा । तो मी पाहो आपुलिया ॥४॥
तुका म्हणे मी या भांडवले पुरता । तुजसी पंढरीनाथा लावियले ॥५॥
