तारुण्याच्या बळे घेऊ
239.
तारुण्याच्या बळे घेऊ धावाशिल झोंबी ।
पडलिया तळी हांसो लागतील उभी ॥१॥
घेसी तरी घेई हरीसवे घाली मिठी ।
नेदी पडो तोचि वंदय करील ये सुष्टी ॥२॥
एकाहूनि एक बळी नये तुझया ध्याना ।
कुंथोनिया येसी तळा होईल तनाना ॥३॥
निळा म्हणे झोंबीलोंबी घेई काळासवे ।
श्रीहरीच्या बळे मग वांटसील नांवे ॥४॥
