नव लक्ष गोपाळ यमुनेत
246.
नव लक्ष गोपाळ यमुनेतटीं । उभे राहुनी दृष्टी पाहताती ॥१॥
खल्लाळाचा शब्द कानी तो ऐकिला । पेंदा पुढे झाला सरसाउनी ॥२॥
पेंदा म्हणे गडिया आपणा पाहुनी यमुना । हुंबरी घेती जाणा पहा पहा ॥३॥
एका जनार्दनी पाहुनिया देव । करिता उपाव नवलाचा ॥४॥
