वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

या पिकलिया अमृताची ग

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074825 · अभंग क्र. २४१

241.
या पिकलिया अमृताची गोडी ।
केवी जाणती इतर जन ।
वाचा बोसिजे सेविता निवे प्राण गे माये ॥
सुखाचा साचा केवी बोलिजे ।
जिवाते केवी सुइजे ॥
अमृतकराचे रश्मी चकोर सेविती ।
ते सुख कोणा कैसे बोलिजे रया ॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु भेटलिया ।
ते सुख कोणा कैसे सांगिजे रया ॥

अर्थ :
ह्या परमार्थ अमृतची पिकलेला रसाची गोडी काय वर्णवी. ते इतर लोक कशी जाणतील? पण आधिकारी मुखीतुन ऐकली प्राणची यातायात निवते. हा सुखाचा विचार अनाधिकाऱ्याला कोण सांगेल. चंद्रकिरणातुन पाझरणारे अमृत चकोर पितात ते त्यांचा अनुभव कसा काय सांगु शकतील. तसेच ते माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठलाच्या दर्शनामृताचे आहे. ते सुख मी कसे सांगु शकेन असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग