वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

पाचाही विषयांचा समूह

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076012 · अभंग क्र. २४५

245.
पाचाही विषयांचा समूह एकत्र ।
होउनी परत्र अंतरले ॥१॥
यालागी संगती उपाय ते भले ।
आपणही केले तरावया ॥२॥
कुरंग तो जाण नादासी वेधला ।
प्राणासी मुकला क्षणामाजी ॥३॥
स्पर्श करोनिया सापडला हस्ती ।
मारिजे माहोती पहासी तू ॥४॥
पतंग रूपासी भुलोनी दीपकी ।
प्राणे गेला दुःखी होउनिया ॥५॥
रसनेचा लोभ धरोनिया मीन ।
न लागता क्षण जीवे गेला ॥६॥
भ्रमर गुंतला कमळामाजी गंधे ।
गेला प्राण वेधे तत्क्षणी ॥७॥
बहेणि म्हणे पाचा विषय पाचजण ।
वेचुनियाप्राण न सुटती ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग