वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

धरसील तरी हाती लागे

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074853 · अभंग क्र. २३९

239.
धरसील तरी हाती लागे बापा ।
सोडसील तरी जाईल दिंगतरा ॥
जतन करी रे जिवाचीया जिवा ।
सांगतसे ठेवा जुगादीचा ॥
निवृत्ती निरोप बुझे आपेंआप ।
आधि पुत्र मागे बाप जन्मे रया ॥

अर्थ :
ज्ञानाच्या साह्याने परमात्म्याला धरावयास गेला तर तो परमात्मा तुझ्या हाती लागेल व धरण्याचा प्रयत्न सोडून दिला तर तो दूर जाऊन तुला सापडणार नाही. हे मी तुला माझ्या ठिकाणचे गुह्य ज्ञान सांगतच आहे म्हणून तो ठेवा जीवापेक्षाही आवडीने जतन कर. माझ्या श्रीगुरु निवृत्तीरायाचा हा निरोप तुझ्याठिकाणी ठसला तर अगोदर पुत्र नतर बाप म्हणजे प्रथम ब्रह्मात्मबोध व नंतर ब्रह्मप्राप्ती होईल असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग