वाचेच्या चापल्ये बहु
239.
वाचेच्या चापल्ये बहु झालो कुशल । नाही बीज मूळ हाता आले ॥१॥
पंढरिराया दुःखी होते मन । अंतरीचे कोण जाणे माझे ॥२॥
पूज्य झालो अंगा आला अभिमान । पुढील कारण खोंळबळे ॥३॥
तुका म्हणे खून न कळेचि निरुती । सांपडलो हाती अहंकाराचे ॥४॥
