आम्हा अलंकार मुद्रां
242.
आम्हा अलंकार मुद्रांचे शृंगार । तुळशीचे हार वाहो कंठी ॥१॥
लाडिके डिंगर पंढरिरायाचे । निरंतर वाचे नामघोष ॥२॥
आम्हा आणिकांची चाड चित्ती नाही । सर्व सुखे पायी विठोबाचे ॥३॥
तुका म्हणे आम्ही निघोचीया मुक्ती । एकाविण चित्ती दुजे नाही ॥४॥
