वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ७. खेळ

फुंकिसी जगा गडी गे त

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089764 · अभंग क्र. २४५

245.
फुंकिसी जगा गडी गे तरि घाली फुगडी ।
नाही तरी नको करु फजिती रोकडी ॥१॥
मोडी आंग बाई गे नाचण्याचे सोयी ।
आठवूनि श्रीहरिचा निजानंद देही ॥२॥
त्या नांव फुगडी गे बंधनाते तोडी ।
नाही तरि कांपवूनि काय टिया मांडी ॥३॥
निळा म्हणे जोडी गे देवासवे गडी ।
आठवूनि ध्यानी मनी रुप घडी घडी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग