टिपरियाचे घाई गे नाच
240.
टिपरियाचे घाई गे नाच सुखे बाई ।
गिती गाऊनिया हरिचे संगमसुख घई ॥१॥
नाचोनिया फेरि गे गुण त्याचे उच्चारी ।
जेणे काग बग रिठा मर्दियले वैरी ॥२॥
ऐसे गाई गाणे गे हरि जोडे जेणे ।
येर येऊ नेदी वाचे लटकी ते वांयाणे ॥३॥
निळा म्हणे नामे गे तोडी मरणजन्मे ।
ऐसा हरि गीती गाता हरतील कर्मे ॥४॥
