वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

गुरूमंत्र देवऔषध भाव

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076036 · अभंग क्र. २४१

241.
गुरूमंत्र देवऔषध भावार्थे ।
फळे, एक-चित्ते पाहे ऐसे ॥१॥
हेचि निर्धारूनी भावर्थेसी भज ।
हृदयीचे गुज सांगितले ॥२॥
पाषाणप्रतिमा भावार्थे भजलीया ।
इच्छितसे तया पावे फळ ॥३॥
बहेणि म्हणे ज्याचा भावार्थ चोखट ।
तयाची वैकुंठ रोकडेची ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग