गडियासी सांगे वैकुंठ
244.
गडियासी सांगे वैकुंठीचा राव । आजी आला भेवो यमुनेंत ॥१॥
जीवनालागीं तेथे कोण्ही पै न जावे । बाऊ आला आहे तया ठायी ॥२॥
तयांचे बालेणें लागे सर्वा गोड । म्हणोनि धरिती चाड संवगडे ॥३॥
एका जनार्दनीऐकोनि वचन । पढती वचन पेंदा बोले ॥४॥
