तपाचे सामर्थ्य आहे ब
246.
तपाचे सामर्थ्य आहे बहु मोठे ।
पाहे तू वरिष्ठ मागील ते ॥१॥
विश्वामित्रे सृष्टी केलीसे दुसरी ।
जाण तपावरी गायत्रीच्या ॥२॥
वसिष्ठे धरित्री दर्भाचिये अग्नी ।
ठेविली सामुग्री तपाची हे ॥३॥
सूर्यतेज आले समक्ष साक्षीसी ।
तयाच्या तपासी कोण वर्णी ॥४॥
अगस्तीने केले आचमन सिंधूचे ।
तप हे तयाचे महा उग्र ॥५॥
बहेणि म्हणे तप जयापासी असे ।
तयासी सायास कासयाचे ॥६॥
