मोक्षपद तुच्छ केले य
245.
मोक्षपद तुच्छ केले या कारणे । आम्हा जन्म घेणे युगायुगी ॥१॥
विटे ऐसे सुख नव्हे भक्तीरस । पुढता पुढती अस सेवावे हे ॥२॥
देवा हाती रूप धरवू आकार । नेंदू निराकार होऊ त्यासी ॥३॥
तुका म्हणे चित्त निवांत राहिले । घ्याई ती पाउले विटेवरी ॥४॥
