वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

वहिलिया येई रे । सौर

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074828 · अभंग क्र. २४६

246.
वहिलिया येई रे । सौरभ्य घेऊनि जाई रे ।
तिया इया जिवित्वाच्या लाह्या रे भ्रमरा ॥
सुमनाचे जीवन विरुळे विपाये । वियोग जालिया केही न साहे रे भ्रमरा ॥
सकळिक पाल्हाळ रे । बापरखुमादेविवरू सुखाचे निधान रे भ्रमरा ॥

अर्थ :
हे जीवरूप भ्रमरा तू आपल्या ठिकाणचा मीतुपणाचा भ्रम टाकून परमात्म्याच्या चरण कमलाचा आनंद घे. असे झाले म्हणजे तुझ्या जीवत्वाचा नाश होऊन जाईल. हे भ्रमरा तुझे जीवन क्षणाक्षणाला नष्ट होत आहे त्यामुळे श्रीकृष्णरूपी फुलाचा वियोग भोगावे लागेल. त्या श्रीकृष्णरूप फुलाच्या सुगंधाशिवाय इतर सर्व सुख नसुन दुःखच आहे म्हणून हे जीवरुप भ्रमरा माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल हेच कोणी फुल असून त्याच्या सुखाचा तू अनुभव घे, असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग