वर्णामाजी एक ब्राह्म
247.
वर्णामाजी एक ब्राह्मण वरिष्ठ ।
ऐसे मागे श्रेष्ठ बोलियेले ॥१॥
म्हणोनि ब्राह्मण पूजावे आदरे ।
मोक्ष याचि द्वारे प्राणियासी ॥२॥
ब्राह्मणाचे मुखी सदा वसे वेद ।
जाणती ते भेद अर्थ त्याचा ॥३॥
बहेणि म्हणे देव वाहे ज्याची लाथ ।
हृदयी विख्यात असे ठावें ॥४॥
