गोपाळ म्हणती कान्हया
245.
गोपाळ म्हणती कान्हया कृष्नातें । आजी यमुनेचे जळ वर्जा का जी ॥१॥
हरी म्हणे तयाते तेथे बाऊ आला । म्हणोनि तया स्थळा नवजावें ॥२॥
ऐकोनिया पेंदा नाचतो दुपांडी । गदियांची मादि सवे घेत ॥३॥
बाऊ पहावया गडे हो अवघे चला । या कृष्णबोला राहुं नका ॥४॥
एका मागे एक गडी ते निघाले । एका जनार्दनी आले यमुनेटीं ॥५॥
