झेटिमेटी बाईगे लवे ह
238.
झेटिमेटी बाईगे लवे हरिच्या पायी ।
नमन नम्रता हेचि परमार्थाचा सोई ॥१॥
निढळासी बोट लावितेसी वेळोवेळा ।
नमनाचि होते सहज खेळता या खेळा ॥२॥
उत्तम हा खेळ गे खेळता निर्मळ ।
नमनी नमिता हाता येतो हा गोपाळ ॥३॥
निळा म्हणे जग तुज करिल कृपा मग ।
येऊनिया वास करिता ह्रदयी श्रीरंग ॥४॥
