पिंगा म्हणिजे पिलंगो
243.
पिंगा म्हणिजे पिलंगोनि भिरभिरियाचे परी ।
फिराविसी माज मान तरि तुझी थोरी ॥१॥
चित्त हरिवरी गे ठेवूनि दे भोवरी ।
नाहीतरी सर परती येथूनि जाय दुरी ॥२॥
वाउगाचि ताठा गे नाही वळवटा ।
येथे नाहिं काम तुझे जाई आल्या वाटा ॥३॥
निळा म्हणे निजानंदे कांपवी शरीर ।
धरुनिया निज मनी रुक्मिणीचा वर ॥४॥
