फिरविसी मान तरी पिंग
244.
फिरविसी मान तरी पिंग्याच्या महिमान ।
नाहीतरी सरे परती जाई वो येथून ॥१॥
धरी हरि चित्ती गे पिंगयाच्या निगुती ।
नाहीतरी वाया जासी भोवंडीचे भ्रांती ॥२॥
मोडशील माजगे तरीच पिंगा साजे ।
लाटण्याऐसी न लवता फजितीचे भोज ॥३॥
निळा म्हणे सांगितले धरी हित कानी ।
तरीच पिंगा मोड तुझा श्रीहरिचिंतनी ॥४॥
