वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 124. श्रीकृष्णलीला

गडयानो राजा कीरे झाल

🙏 4. संत नामदेव · ABH-083827 · अभंग क्र. २४२

242.
गडयानो राजा कीरे झाला । कृष्ण सिंहासनी बैसला ॥१॥
पांवा मोहरी घोंगडी । आम्ही खेळु यमुने तटी । नाचा पाउला देहुडी । कृष्ण आमुचा किरे गडी ॥२॥
खेळू हुतुतु हुंबरी । थडक हाणो टीरीवरी । आता चालिला दळभारी । आमचे यशो-देचा हरी ॥३॥
कुस्ती खेळता कासाविसी । शेंबुड खरकटे नाकासी । कडे घेऊ सावकासी । आता बहु भितो यासी ॥४॥
आम्ही तुम्ही सवे जाऊ । गाई वळावया जाऊ । त्याचे मानेंत बुक्या देऊ । जवळी जावयासी भिऊ ॥५॥
नामा म्हणे चला जाऊ । हात जोडोनी उभे राहू । पाया पडून मागून घेऊ । जनींवनी तोचि कृष्णजी ध्याऊ ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग