वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

चितिले अपैसे । पाविज

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074791 · अभंग क्र. २३८

238.
चितिले अपैसे । पाविजे सायासे ।
तरी कामा नसे । सायास या ॥१॥
देखणे स्वप्नींचे । भुररे मायेचे ।
भ्रमित देहाचे हरिवीण ॥२॥
आयुष्याचे पेठे । संसाराचे तट ।
गुरुवीण वाट । कैंची रया ॥३॥
त्रिपुटिसी वर्ते । वैकुंठ सरते ।
प्रेमेवीण भरिते । कैसे येत ॥४॥
ज्ञानदेवी घर । केले पै सपुर ।
संसार येरझार हरिचरणी ॥५॥

अर्थ :
मायाकार्य अनात्म पदार्थाचे चितंन केले असता म्हणजे त्याची उपेक्षा केला असता ते जर सहजासहजी प्राप्त होत असतील तर त्याकरिता मोठे कष्ट करण्याचा गरज नाही. असे असले तरी ते अनात्म पदार्थ स्वप्नातील पदार्थाप्रमाणे आहेत. परंतु मायायोगाने भुरळ पडल्यामुळे देहाच्या ठिकाणी सत्यत्वाने ते भासत असतात. म्हणजे देहाला सुखोपभोगी वाटत असतात. त्यातून सुटण्याची वाट सद्गुरु वाचून कोण दाखविणार. संसाराच्या तटात आयुष्यभर साह्य करणारा दुसरा कोण आहे. तो श्रीहरि जागृती स्वप्न व सुषुप्ती या त्रिपुटीत नित्य आहे. पण त्याच्या ठिकाणी प्रेम असल्या शिवाय अंतःकरणात प्राप्ती कशी होईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मी माझ्या शरिरात श्री हरिचे मोठे स्थान करुन जन्ममृत्युरुप संसाराची येरझार हरिचरणी संपवली.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग