वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 11. उपदेश

पाणी तेचि मेघ मेघ ते

🙏 16. संत जनाबाई · ABH-074028 · अभंग क्र. २४६

246.
पाणी तेचि मेघ मेघ तेचि पाणी । काय या दोन्हीपणी वेगळीक ॥1॥
माती तेचि धूळ धूळ तेचि माती । भेंडा आणि भिंती काय दोन ॥2॥
साखरी गोडी गोडी साखरेसी । थिजले तुपासी काय दोन्ही ॥3॥
डोळा ते बुबुळ बुबुळ तो डोळा । शांति ज्ञानकळा काय भिन्न ॥4॥
वदन ते ओंठ ओंठ ते वदन । क्षेमआलिंगन काय दोन ॥5॥
जीभ ते पडजीभ पडजीभ ते जीभ । आशा आणि लोभ काय दोन ॥6॥
संत तेचि देव देव तेचि संत । म्हणे जनी मात गोष्‍टी भिन्न ॥7॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग