खेळो पंडखडे गे बैसोन
241.
खेळो पंडखडे गे बैसोनि निवाडे ।
आधी उचली एक मग दोनि घेई पुढे ॥१॥
सावधान चालि गे नेमाचेचि झेलि ।
दोन तीन पांच सात सांडी येक उचली ॥२॥
नेदी लागो ढका दुसरियासि झोका ।
हळूचि घेई उचलूनिया तरिच खेळ निका ॥३॥
निळा म्हणे हरि गे साक्ष निरंतरी ।
तोचि जाणे सर्व आहे तुज मजही माझारी ॥४॥
