काम क्रोध वैरी हे खळ
128.
काम क्रोध वैरी हे खळ । लोभ अहंकार आशा बरळ ।
कर्म बळीवंत लागले सबळ । तेणे वेधिले आमुतें निखळ ॥१॥
नको नको वियोग हरी । येई येई तू झडकरी ।
आम्हा भेटें नको धरु दुरी । वियोग झाला तो आवरीं ॥२॥
तुझिया भेटिंचे आर्त मनी । याकारणें विरह बोलणे वाणी ।
एका शरण जनार्दनी । वियोग गेला पाहता समचरणीं ॥३॥
