वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

प्राणीमात्र पर्वतातळ

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089819 · अभंग क्र. १३१

131.
प्राणीमात्र पर्वतातळी ।
राहिले ते निजानंद मेळी ।
नित्य हरिकीर्तीची नव्हाळी ।
श्रवण मनन करिताती ॥१॥
सप्तअहोरात्रीवरि ।
पर्जन्यवृष्टी केली भारी ।
विजुवा कडाडिती गगनोदरी ।
तेणे ब्रम्हांड फुटों पाहे ॥२॥
मुसळधाराखळखळाटे ।
नदिया पूर वाहति नेटे ।
पवन वाते झडझडाटे ।
पाषाण जाति उडोनिया ॥३॥
परि तया पर्वतातळी ।
पर्जन्य वात नपवेचि बळी ।
हिंपुटी होऊनिया जवळी ।
गेलि इद्रा सांगती ॥४॥
सप्त अहोरात्रे पाडिलो वरी ।
खाणोनि सांडिली ते नगरी ।
खडका वाचूनिया दुसरी परी ।
नुरोचि मृत्तिका ऐसे केले ॥५॥
ऐकोनिया हरिखले सुरपती ।
बहूत मानवाला त्याचे शक्ति ।
परी गोकुळींच्या लोकांप्रती ।
नाहीची आढळला पर्जन्य वात ॥६॥
निळा म्हणे हरी दादुला ।
सकळिका म्हणे बाहेरी चला ।
अवघा मेघ ओसरोनि गेला ।
उन्हे पडिली खडखडाट ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग