वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 14. विरहावस्था - अभंग ११९ ते १३८

जन्म जन्मांतरी विराह

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087432 · अभंग क्र. १२७

127.
जन्म जन्मांतरी विराहिणी । होती दुश्चित्त अंतःकरणी ।
दुःखी सेशिलें होते मागे जन्मी । ये खेपे निरसले स्थुळ कारणीं ॥१॥
येउने भेंटी देही देहातीत । तयाचा विरह मजलागी होत ।
मना समुळ मन पहात । तो भेटला गोपीनाथ ॥२॥
दुःख फिटले मान जाले थोर । हर्षे आनंदे आनंद तुषार ।
एका जनार्दनी भेटला परात्पर । तेणे संसार विरह गेला निर्धार ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग