आणिले उसने पाचांचे श
124.
आणिले उसने पाचांचे शरीर ।
साधावया सार मोक्षपंथ ॥१॥
येथे तुवा जरी माडिला आळस ।
होईल बरी नाश स्वहिताचा ॥२॥
भाड्याचे घोडे करूनि आणिले ।
पाहिजे साधिले कार्य त्वरे ॥३॥
बहेणि म्हणे ज्यचे नेईल तो धनी ।
होईल ते हानि स्वहिताची ॥४॥
