यात्रा फिरोनिया माघा
128.
यात्रा फिरोनिया माघारी ।
आली गोकुळाभीतरी ।
उव्देग करिती घरोघरी ।
म्हणती अनर्थ् वोढवलां ॥१॥
इंद्र कोपलियावरी ।
अणुमात्रही वृष्टी न करी ।
बरग पाडूनिया दारी ।
उरो नेदील शेंपूट ॥२॥
अनावृष्टी नव्हता पीक ।
मरती दुष्काळे पिडती लोक ।
अथवा अतिवृष्टी करुनी सकळिक ।
बुडवील निमिषार्धे ॥३॥
भयचि अणुमात्र न वाटे कृष्णा ।
परि हा कोपलिया देवराणा ।
करील नाश एक क्षणा ।
पळमात्रही न लगता ॥४॥
हे असो भक्षिला गोरस ।
तुप्ती सांडी उदगारास ।
वांकुल्याही गोवर्धनास ।
कृष्ण म्हणे रे दाखवा ॥५॥
हे इंद्र देखोनिया दृष्टी ।
क्रोधे संतप्त झाला पोटी ।
मेघा पाचारुनिया म्हणे वृष्टी ।
करा निर्घारे गोकुळावरी ॥६॥
पाचारुनि संवर्तका ।
म्हणे गोकुळीची नुरवी मृत्तिका ।
मुसळधारी वषोंनी उदका ।
मेळवी नेउनी सागराच्या ॥७॥
येरु म्हणे बहुत बरे ।
आज्ञा केली ते सुरस्वरे ।
करीन परी एक दुसरे ।
पाहिजे मज साह्यार्थ ॥८॥
दयावा सवे प्रचंड वात ।
करावया गोकुळाचा घात ।
इंद्रे पाचारुनिया त्याते त्वरित ।
म्हणे जावे याच्या संगे ॥९॥
निळा म्हणे स्वमुखे त्यासी ।
सांगे जाउनी गोकुळासी ।
मोडूनिया तेथचिया वृक्षांसी ।
घरा खोपटांसी उडवावे ॥१०॥
