मागे विरह बहुतंशी झा
129.
मागे विरह बहुतंशी झाला । संसारश्रम वाया केला । क्षणभरीं विश्रांती नाही मला । तो सदगुरु जिवलगा भेटला ॥१॥
आता विरहाची सरली गोठीं । डोळेंभरी पाहिल्या जगजेठी । जाउनी चरणी घालावी मिठी । विरह गेला समुळ दृष्टी ॥२॥
एका जनार्दनी पाहता आनंदलें । जन्म जन्मातरींचें दुःख । फिटले विरहाविरहें हर खुंटले । काया वाचा मने वेधले वो ॥३॥
