तृणाचिया लोभेम गायी
124.
तृणाचिया लोभेम गायी गेल्या दुरी । पाचारी मुरारी नामे त्यांची ॥१॥
चंद्रभागे गंगे भागीरथी यमुने । येई ताम्रपर्णे धांवोनिया ॥२॥
सरस्वती प्रवरे कालिंदी नर्मदे । येई तुंगभद्रे धां-वोनिया ॥३॥
देवाजीच्या शब्द ऐकोनिया कानी । येताती धांवोनी नामा म्हणे ॥४॥
